नगरसेविका संतोषी तुपे यांची मागणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांच्या आठवणी कायम टिकून राहाव्यात यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी नगरसेविका संतोषी तुपे यांनी केली आहे. दोन ते तीन वर्षापासून त्या यासाठी पाठपुरावा करीत असून त्यांनी शनिवारी (दि. 3) आयुक्त गणेश देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल यांना स्मरणपत्र दिले. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून त्यांचे भव्य स्मारक उभारावे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वर्ग सुरू करावेत, अशी मागणी संतोषी तुपे यांची आहे. निवेदन सादर करते वेळी पालिकेतील सभागृह नेते परेश ठाकूर, बुथ अध्यक्षा ललिता इनकार, शक्तिकेंद्र प्रमुख संदीप तुपे आदी उपस्थित होते.