खोपोली ः प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकला कारची धडक बसल्याने तीन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील उर्से गावाजवळ शुक्रवारी (दि. 17) सकाळी हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार (एमएच 04 जेएम 5349) एक्स्प्रेस वेवर उर्से गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला (आरजे 09 जीबी 3638) मागून जोरदार धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटलची यंत्रणेने मदतकार्य केले तसेच महामार्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …