मोबाईल वर्ल्ड काँग्रेसला सुरुवात झालीय. जगभरातील स्मार्टफोन मेकर कंपन्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात… अनेक कंपन्या आपले नवनवीन अविष्कार या कार्यक्रमात लॉन्च करतात. या वर्षी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये 5जी स्मार्टफोन, फोल्डेबल स्मार्टफोनसहीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. या कार्यक्रमात नोकियानं आपला मोस्ट अवेटेड नोकिया 9 प्युअरव्ह्यू हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे, यात एक-दोन नाही तर तब्बल पाच कॅमेरे आहेत. हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात पाच रिअर कॅमेर्यांचा वापर करण्यात आलाय. पाच कॅमेरे नएखडडकडून सर्टिफाईड करण्यात आले आहेत. पाचही कॅमेरे 12 मेगापिक्सलचे आहेत. यातील तीन मोनोक्रोमॅटिक लेन्ससहीत, तर दोन ठॠइ लेन्ससहीत देण्यात आलेत. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा एक कॅमेरा आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 5.99 इंचाचा जिङएऊ टकऊ आहे. या स्मार्टफोनमध्ये र्टीरश्रलेाा’ी डपरविीरसेप 845 प्रोसेसरचा वापर करण्यात आलाय. रॅम 6 जीबी आहे. इंटरनल मेमरी 128 जीबी आहे. याशिवाय फिंगर प्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीचाही यात वापर करण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये टळ वायरलेस चार्जिंग सिस्टम सुविधेचा वापर करण्यात आलाय. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जवळपास 50,000 रुपये मोजावे लागणार आहेत. चथउ 2019 या कार्यक्रमात नोकियाने पाच स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. नोकिया 9 प्युअरव्ह्यू शिवाय नोकिया 210, नोकिया 1 प्लस, नोकिया 3.2, नोकिया 4.2 हे स्मार्टफोनदेखील लॉन्च करण्यात आलेत. पाचही स्मार्टफोन वेगवेगळ्या सेगमेंटमधील आहेत. नोकिया 210ची बाजारातील किंमत 2500 रुपयांच्या जवळपास आहे. नोकिया 1 प्लसची किंमत जवळपास 7000 रुपये आहे. नोकिया 3.2 ची किंमत जवळपास 10,000 रुपये आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …