Breaking News

नवी मुंबईत प्रथमच सन थीम गार्डन

सीवूड येथील महात्मा ज्योतिबा फुले उद्यानाचे लोकार्पण

नवी मुंबई ः प्रतिनिधी

नवीन वर्षांत सीवूड सेक्टर 40 येथे नवी मुंबईतील पहिले सन थीम गार्डन साकारण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले उद्यानाचे नव्याने नूतनीकरण करण्यात असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची माजी नगरसेविका स्वप्ना गावडे यांच्या विशेष प्रयत्नांतून हे आकर्षक उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्यावर आधारित विविध गोष्टी या उद्यानात उभारण्यात आल्या आहेत. उद्यानातील सन डायल घड्याळ सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

महात्मा ज्योतिबा फुले उद्यानामध्ये सन डायल घड्याळ ही थीम राबविण्यात आली आहे. प्राचीन काळामध्ये सूर्याच्या किरणांवर वेळ ठरवली जात होती. तशा पद्धतीचे घड्याळ ह्या उद्यानामध्ये बसविण्यात आले आहे. सूर्य जसा वर येत जातो,  तशा पद्धतीने वेळ दर्शवली जाते, तसेच पर्यावरणाचा समतोल कशा पद्धतीने राखला पाहिजे याचे हुबेहूब वास्तव उदाहरण ह्या उद्यानात उभारण्यात आलेल्या थीमच्या माध्यमातून देण्यात आले आहे.  येथील उद्यानामधून नागरिकांना अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आणि घेण्यासारख्या आहेत. नागरिकांना प्रसन्न वातावरण निर्माण करून देणारे नवी मुंबईतील एकमेव उद्यान उभारण्यात आलेले आहे. याशिवाय उद्यानातील सर्वात आकर्षण केंद्रबिंदू हा सूर्यावर आधारित उभारलेले घड्याळ हे वेळ दर्शविणारे आहे. सौरऊर्जेवर चालणारे सौर दिवे कार्यान्वित केले आहेत. नागरिकांना चालण्यासाठी पाथ वे शिवाय विविध प्रकारचे फाऊंटन इथे येणार्‍या नागरिकांचे आकर्षण आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply