Breaking News

खूशखबर! यंदा मान्सून उत्तम; दुष्काळाची शक्यता नाही

नवी दिल्ली : देशातील शेतकर्‍यांसाठी खूशखबर आहे. गेल्या वर्षी मान्सूनने ओढ दिल्याने यंदा राज्यासह देशात दुष्काळाचे सावट असून, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, परंतु यावर्षी देशातील मान्सून सामान्य राहील, तसेच दुष्काळही पडणार नाही, असा अंदाज ‘स्कायमेट’ संस्थेने वर्तवला आहे. 2019-20साठीचा मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवताना ‘स्कायमेट’ने यावर्षी 96 ते 104 टक्के पाऊस पडेल, असे म्हटले आहे. यंदा भारतात मान्सून सर्वसामान्य राहण्याची शक्यता 50 टक्क्यांहून अधिक आहे, असे ‘स्कायमेट’चे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जतीन सिंह यांनी म्हटले आहे. यंदा अल निनोची संधी खूप कमी आहे. ‘स्कायमेट’चा पहिला हवामान अंदाज 1 एप्रिलला प्रसिद्ध होईल, असेही सांगण्यात आले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply