Breaking News

पनवेल एसटी आगारात काम सुरू

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल एसटी आगाराच्या नूतनीकरणाला मुहूर्त सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगाराबाहेर प्रवाशांना उभे राहण्यासाठी पत्र्याची शेड उभारण्यात येऊन गाडी उभी करण्यासाठी असलेल्या जागेवर सिमेंट काँक्रिट टाकण्याचे काम सध्या सुरू झाले आहे.

मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पनवेलमध्ये असलेल्या एसटी आगारात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून येणार्‍या-जाणार्‍या बसेस येत असतात. त्यात दररोज हजारो प्रवासी असतात. याशिवाय नोकरी-धंद्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून हजारो नागरिक येथील बसस्थानकातून प्रवास करतात. त्यासाठी आगारातून रोज 72 नियते चालवली जातात. त्यासाठी 165 चालक व 159 वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोज पाच हजारांपेक्षा जास्त गाड्या या बसस्थानकात येत असताना महामंडळाचे मात्र आगाराकडे दुर्लक्ष होत आहे. 

गुजरात परिवहन महामंडळाच्या सुरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बांधणार, असे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले होते. या बसपोर्टमध्ये तळमजल्यावर बसथांबा, प्रवासी विश्राम कक्ष, दुसर्‍या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय, तर तिसरा आणि चौथा मजला व्यावसायिकांसाठी असे नियोजन आहे.

दरम्यान, पनवेलच्या वरिष्ठ आगारप्रमुख एम. पी. वानखडे यांनी महाडसाठी सकाळी तीन जादा गाड्या सुरू केल्याची माहिती दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply