रोहे ः प्रतिनिधी
जमिनीचे फेरफार नोंद मंजूर होऊन उतारा देण्याकरिता तलाठी संतोष मनोहर चांदोरकर यांनी 10 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत (एसीबी) विभागाने बुधवारी (दि. 26) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.. विशेष म्हणजे या आधीही या तलाठ्यावर महाड येथे दोन वेळा कारवाई करण्यात आली होती.
तक्रारदारांना जमिनीचे फेरफार नोंद मंजूर होऊन उतारा देण्याकरिता आरोपी संतोष मनोहर चांदोरकर (वय 43, तलाठी, सजा भालगांव) यांनी तक्रारदारांकडे 30 मे रोजी 10,000 रुपयांची मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून बुधवारी रोहा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …