Breaking News

राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठक

खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी -जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

अलिबाग : जिमाका

कोकणातील महत्त्वाचा सण गणेशोत्सव 2 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. राज्याच्या विविध शहरातून गणेशोत्सवासाठी कोकणात नागरिक येत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व सुरळीत व्हावा याकरिता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी अधिकार्‍यांशी बोलत होते. गणेशोत्सवापूर्वी या महामार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी सूचना  त्यांनी या वेळी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्यश्री बैनाडे, पेण उपविभागीय अधिकारी  प्रतिमा पुदलवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, राष्ट्रीय महामार्ग पनवेल प्रबंधक अभिषेक अग्रवाल, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग पेण रत्नाकर बामणे, शाखा अभियंता, रा. म. विभाग पेण रूपेश सिंगासने, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण संजय उदावत, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, वाहतूक पोलीस विभागाचे सुरेश वार्डे तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदी या वेळी उपस्थित होते.

विविध तंत्रज्ञानाचा तसेच जादा मनुष्यबळाचा वापर करून रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पेवरब्लॉक बसविण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच गणेशोत्सव काळात पोलीस विभागाने महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे होईल असे पाहावे.

-डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply