गयाना : वृत्तसंस्था
वेस्ट इंडिजविरोधातील ट्वेंटी-20 मालिकेत टीम इंडियाने निर्भेळ यश मिळवले. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजवर सात विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिका 3-0 अशी खिशात घातली. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका अंध चाहत्याची भेट घेतली. लेरॉय असे त्याचे नाव असून या तिघांनी चाहत्याचा दिवस स्पेशल बनवला.
भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत वर्चस्व गाजवले. या सामन्यानंतर कोहली, रोहित आणि शास्त्री यांनी लेरॉयशी गप्पा मारल्या.
भारतीय संघाचा जबरा फॅन असलेल्या लेरॉयने या वेळी कोहलीशी भरपूर गप्पा मारल्या. कोहलीची आक्रमक फलंदाजी आवडत असल्याचे लेरॉयने सांगितले. वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवानंतर दुःख झाल्याचेही लेरॉयने सांगितले.