पनवेल ः रामप्रहर वृत्त
सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कामोठे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन दिलीप पाटील, सचिव डॉ. मंदार पनवेलकर, संस्थेचे संचालक अर्जुन गोवारी, मुख्याध्यापिका मनीषा जाधव, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जान्हवी महाले हिने केले. कार्यक्रमात आदिवासी नृत्य, आदिवासी विवाह गीत, नाटिका व विद्यार्थ्यांची भाषणे यांचा समावेश होता.