Breaking News

मी निर्दोष; विनाकारण गुंतविले -संजय पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त

मी कोणत्याही प्रकारे मतदारांना पैसे वाटप केले नाहीत किंवा पैशांचे आमिषही दाखविले नसताना विनाकारण त्या प्रकरणात गुंतविण्याचा प्रकार झाला असून, मी पूर्णतः निर्दोष आहे, असे देवद येथील भाजपचे युवा कार्यकर्ते संजय हिरामण पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात बोलताना संजय पाटील यांनी सांगितले की, मी व्यावसायिक असून, माझे गणेश मार्केट येथे जतिन कलेक्शन  नावाचे कपड्याचे दुकान आहे. त्याचबरोबर माझ्या पाटील कुटुंबात जवळपास 26 मतदार आहेत. माझ्याकडे असलेल्या वहीत माझ्या कुटुंबातील व्यक्तींची नावे नमूद होती. त्यांच्या नावाच्या मतदानाच्या स्लिप माझ्याकडे होत्या. 

माझा व्यवसाय असल्याने कायम पैसे जवळ असणारच. मी माझ्या स्वतःच्या घराच्या पायरीवर उभा असताना पथकाने माझी झडती घेतली. त्यावेळी माझ्याच कुटुंबातील मतदारांच्या स्लिप व नावाची नमूद असलेली वही आणि व्यवसायाचे 26 हजार 100 रुपये त्यांना मिळाले, मात्र मतदारांना मी कोणत्याही प्रकारे पैसे वाटप केले नाही किंवा पैशांचे आमिषही दाखविले नाही. असे असतानाही विनाकारण कारवाई झाली आहे, असे संजय पाटील यांनी म्हटले आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply