वडगाव येथील ‘रयत’च्या न्यू इंग्लिश स्कूल इमारतीचे उद्घाटन
पुणे : प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक उद्धारासाठी ज्या हेतूने रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या रयत शिक्षण संस्थेचा लौकिक या संस्थेतील शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी वाढवावा, असे आवाहन संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 27) वडगाव, पुणे येथे केले.
रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त पुणे वडगाव येथील न्यू इंग्लिश प्राथमिक विद्यामंदिर विस्तारित इमारतीच्या उद्घाटन सोहळा, तसेच माजी विद्यार्थी मेळावा आणि देणगीदारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. प्राथमिक विद्यामंदिर विस्तारीत इमारतीचे उद्घाटन मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा रयतचे पुणे पश्चिम विभागीय चेअरमन अॅडव्होकेट राम जनार्दन कांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी उपस्थितांसमोर ते बोलत होते. या वेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भविष्यात यशस्वी व्हा, असे सांगितले. या सोहळ्याला माजी आमदार तथा स्थानिक स्कूल कमिटी सदस्या रूपलेखाताई ठोरे, ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अजित अभंग, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य ज्ञानेश्वर गाडे, वनराज ढोरे, अॅड. विलास गोखले, आयआरबी अधिकारी प्रवीण ताईडे, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार, विभागीय अधिकारी किसनराव रत्नपारखी, वडगाव उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर, सदस्य दिनेश ढोरे, पूजा वहिले, दीपाली मोरे, शारदा ढोरे, पूनम जाधव, चंद्रजित वाघमारे, प्रवीण चव्हाण, किरण म्हाळसकर, सुनीता भिलारे यांच्यासह पदाधिकारी, रयत सेवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे पुणे पश्चिम विभागीय चेअरमन अॅड. राम जनार्दन कांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.