Breaking News

पंतप्रधान मोदींना यूएईकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संयुक्त अरब अमिरात (यूएर्ई)कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झायेद पदकाने सन्मान करण्यात येणार आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांचा सर्वोच्च नागरी गौरव केला जाणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि यूएई या दोन्ही देशांतील संबंध एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले. यामध्ये पंतप्रधान मोदींचा मोठा वाटा असल्याने त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आल्याची माहिती अबूधाबीचे राजपुत्र प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायेद यांनी ट्विट करून दिली. यापूर्वी महाराणी एलिजाबेथ, जॉर्ज डब्ल्यू बुश, व्लादिमीर पुतिन, निकोलस सरकोजी, क्षी जिनपिंग आणि अँजेला मर्केल यांना झाएद पदकाने गौरविण्यात आले आहे.

याआधी फेब्रुवारीत पंतप्रधान मोदींना सेऊल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दक्षिण कोरियाकडून हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply