Breaking News

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप

डॉ. पुरकर यांच्या स्मरणार्थ आवाज परिवाराचा उपक्रम

माणगाव : प्रतिनिधी

येथील आवाज परिवाराकडून ज्येष्ठ पत्रकार पैगंबरवासी डॉ. महम्मदशफी पुरकर यांच्या स्मरणार्थ बुधवार (दि. 21) सकाळी माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना भाजप ओबीसी सेलचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले.

डॉ. महम्मदशफी पुरकर यांचे गतवर्षी बकरी ईद (1 ऑगस्ट) च्या दिवशी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त बुधवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले, उद्योजक विजयशेठ मेथा, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे, अ‍ॅड. झहीर सनगे, सामाजिक कार्यकर्ते गणेश चव्हाण, संतोष दोशी, मनोहर मेहता, प्रा. हर्षल जोशी, एकता असोसिएशनचे संस्थापक राहुल दसवते, पत्रकार मजिद हाजिते, आजेश नाडकर, दीपक दपके आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply