‘मोफत होमिओपथी’ आरोग्य शिबिराला प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त
धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, सर्वांनी आपले आरोग्य जपा, योग्य वेळी योग्य तपासण्या करून घ्या, असा सल्ला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला.
धम्मयान संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या समोरपानिमित्त ‘मोफत होमिओपथी’ आरोग्य शिबिराचे आयोजन शनिवारी (दि. 31) करण्यात आले होेते. हे शिबिर खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आले असून, याचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. धम्मयान संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत होमिओपथी आरोग्य शिबिराच्या उद्घाटनावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ब अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीताताई पाटील, कुसुम पाटील, डॉक्टर नितीन पोवळे, भाजप नेते गणेश पाटील, भीमराव पोवार, मोतीराम कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.