Breaking News

जासई हायस्कूलमध्ये वह्यावाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत जासई येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी जासई विभागीय अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे, गोपीनाथ म्हात्रे, सुनील घरत, चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुणा घरत, कृतिका घरत, प्राचार्य जे. जी. विधाने, कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या.

Check Also

सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …

Leave a Reply