तळोजा : प्रतिनिधी : न्यू मेरीटाईम जनरल कामगार संगटना हायकल युनिट तळोजा यांच्या वतीने जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. कामगारांच्या हक्कांसाठी आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी जे जे हुतात्मा झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. न्यू मेरीटाईम जनरल कामगार संगटनेचे उपाध्यक्ष, हायकल युनिटचे जनरल सेक्रेटरी पी. एस. म्हात्रे यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. या वेळी कार्यक्रमाला नीलेश कदम, महेश यादव, विनोद देसाई, सुधाकर आळेकर व इतर कामगार उपस्थित होते.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …