रोहे ः प्रतिनिधी : पाणीटंचाईचे सावट असलेल्या मढाली, वांदोली व वांदोली आदिवासी वाडी (ता. रोहा) या गावांची गटविकास अधिकारी पंडित राठोड व विस्तार अधिकारी सुनील गायकवाड यांनी पाहणी केली. या गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे, मात्र ते लांबून आणावे लागते. टंचाई भासली, तर या गावाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे पंडित राठोड यांनी पाहणी दरम्यान सांगितले. रोहा तालुक्यातील मढाली, वांदोली व वांदोळी या गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतो, मात्र ज्या विहिरीवर ही योजना राबवली आहे, त्या विहिरीचे पाणी कमी होत असल्याने सध्या ही योजना बंद ठेवण्यात आली आहे. तर वांदोली आदिवासीवाडीतील बांधव रस्त्याच्या पलीकडे असलेल्या विहिरीवरून पाणी भरत आहेत. पाण्यासाठी त्यांना लांब जावे लागत आहे. पाणीटंचाईची शक्यता असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे केली आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी पंडित राठोड व विस्तार अधिकारी सुनील गायकवाड यांनी मढाली, वांदोली व वांदोली आदीवासीवाडी या गावांची पाहणी करून, पाणीपुरवठ्याबाबत आढावा घेतला.
Check Also
झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!
‘पुरवैय्या’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …
RamPrahar – The Panvel Daily Paper