Breaking News

‘हाऊडी मोदी’ : खोपोलीच्या चित्रकाराचे पुस्तक पंतप्रधानांना भेट

खोपोली : प्रतिनिधी

येथील प्रख्यात चित्रकार दीपक पाटील यांच्या स्केचेसने साकारले गेलेले अंतर्नाद हे पुस्तक भारतीय वंशाचे अमेरिकेत स्थायिक असलेले डॉ. विनोद शहा यांनी रविवारी (दि. 22) हाऊडी मोदी या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले. या पुस्तकाची संपूर्ण संकल्पना डॉ. शहा यांची असून, यात रामराज्य ते 2030 साली भारत देश कसा असावा हे स्केचेस लिखाणातून दर्शविण्यात आले आहे.

विनोद शहा गेली अनेक वर्षे अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी येथे कुटूंबासह राहतात. ते अमेरिकेत वास्तव्यास असले तरी त्यांची नाळ भारताशी आजही जोडलेली आहे, हे अंतर्नाद या पुस्तकातील विचारांनी जाणवते. या पुस्तकाचे काम खूपच कमी कालावधीत पूर्ण करायचे असल्याने चित्रकार संजय शेलार (कोल्हापूर), नवनाथ चोभे (अहमदनगर), शुभम बाविस्कर (शिरपूर), भटू बागले (मुंबई), ऋचा प्रसाद लिमये (ठाणे)  यांचे अमूल्य सहकार्य मिळाले, तसेच या पुस्तकाचे संपूर्ण डिझाईन किशोर पाटील यांनी केले आहे. या कामासाठी निवड केल्याबद्दल दीपक पाटील यांनी विनोद व केतन शहा यांचे आभार व्यक्त केले. हे पुस्तक भारतातील नामवंत व्यक्तींनाही भेट स्वरूपात दिले जाणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply