Breaking News

कामोठ्यातील पाणी बिलाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. प्रशांत ठाकूर यांचा सत्कार

सोसायट्यांचे रहिवासी, बचतगटातील महिला, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

कामोठे वसाहतीतील पाणी बिलाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा रविवारी (दि. 22) हृद्य सत्कार करण्यात आला. या वेळी विविध सोसायट्यांचे रहिवासी, बचतगटातील महिला आणि युवा व सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

भोगवटा प्रमाणपत्राअभावी (ओसी) वाणिज्य दराच्या भरमसाठ पाणी बिलामुळे कामोठे येथील अनेक सोसायट्यांचे रहिवासी गेल्या 18 वर्षांपासून त्रस्त होते. बिलापोटी थकीत व्याज व दंडाची रक्कम रहिवाशांच्या आवाक्याबाहेर गेली होती. परिणामी कित्येक सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या बिलांचे रहिवासी दरात  रूपांतर करीत त्यावरील व्याज व दंड माफ करण्याचा निर्णय घेऊन रहिवाशांना दिलासा दिला. याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन त्यांच्या सेक्टर 36 येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते.

या कार्यक्रमास रिपाइंचे कोकण अध्यक्ष नगरसेवक जगदिश गायकवाड, नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, के. के. म्हात्रे, भाऊ भगत, रवी जोशी, तानाजी पाटील, शरद जगताप, हर्षवर्धन पाटील, नवनाथ भोसले, विनोद आटपाडकर, अनिल चव्हाण, हरिपाल बिस्ट आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी जुही अपार्टमेंट, सरिता संगम, मानसरोवर कॉम्प्लेक्स, नंदनवन पार्क सोसायटी, महिला बचतगट, गुजराती बांधव, तसेच युवा व सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचीही ग्वाही दिली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply