Breaking News

माथेरानमध्ये घरातील सिलिंडरला आग

कर्जत : बातमीदार

थेरानमधील नागेश कदम यांच्या घरात स्वयंपाक सुरू असताना बुधवारी सकाळी गॅस सिलिंडरने पेट घेतला.  स्वयंपाकघरात काम करीत असलेल्या महिलांना काहीही समजले नाही. सर्वत्र पळापळ सुरू झाली. शेजारी व मित्रमंडळींच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. नागेश कदम यांच्या घरात बुधवारी श्राद्धानिमित्त स्वयंपाक सुरू होता. पाच-सहा महिला काम करीत होत्या आणि अचानक गॅस सिलिंडरला असलेल्या रेग्युलेटरने पेट घेतला. थोड्याच वेळात सिलिंडरही पेटला. त्यामुळे महिला गोंधळून गेल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नागेश कदम, अरविंद कदम व त्यांच्या सहकार्‍यांनी स्वयंपाकघरात जाऊन ओली चादर पेट घेतलेल्या टाकीभोवती गुंडाळली, पण तुरळक प्रमाणात गॅसगळती सुरू होती, म्हणून त्यांनी मातीचा मारा सुरू केला.  माथेरान नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. माथेरानचे माजी नगरसेवक दिनेश सुतार यांनी दुकानातील फायर कंट्रोल टाकी घेऊन घटनास्थळ गाठले. त्यांनी फायर कंट्रोल स्प्रेच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणली. अग्निशमन बंबही दाखल झाला. फायर ब्रिगेडचे कर्मचारी अजिंक्य सुतार यांनी स्वयंपाकघरात जाऊन सिलिंडर बाहेर काढले व ते सुरक्षितस्थळी हलविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply