Breaking News

सहा कोरोनाबाधित उपजिल्हा रुग्णालयात

पनवेल : बातमीदार – पनवेलमधील सहा सीआयएसएफ जवानांना कोरोनाची बाधा झाली असल्याने त्यांना पनवेल येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, 21 जवानांना पनवेल महानगरपालिकेने सुरू केलेल्या खारघर येथील ग्रामविकास भवनमधील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.

पनवेलमधील कळंबोली येथे सीआयएसएफचे मुख्यालय आहे. येथे सीआयएसएफचे 147 जवान वास्तव्यास आहेत. यातील काही जवान मुंबई विमानतळ येथे कार्यरत आहेत. यातील सात जवानांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय असल्याने त्यांची तपासणी केली असता त्यातील पाच जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पनवेल महानगरपालिका आणि सीआयएसएफच्या मुख्य अधिकार्‍यांनी येथील उर्वरित 140 जवान आणि तेथे काम करणारे कामगार असे एकूण 154 जणांची करोना चाचणी करून घेतली. शुक्रवारी त्यातील पाच जवानांची तसेच तेथील एका कर्मचार्‍याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली.

या सहा जणांना पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तर, 21 जवानांना खारघर येथे ग्रामविकास भवनमधील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. उर्वरित सगळ्यांचे त्यांच्या इमारतीमध्येच विलगीकरण करण्यात आले आहे. ही इमारत सील करण्यात आली असून त्यांना लागणारे अत्यावश्यक सामान महापालिका आणि सीआयएसएफ प्रशासनाकडून देण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्त

गणेश देशमुख यांनी दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply