Breaking News

मोदी-शहा यांच्या महाराष्ट्रात होणार सभा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जास्तीत जास्त सभा घेण्यावर भाजपने भर दिला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात त्यांच्या सभांचा धडाका पाहावयास मिळणार आहे.

महाराष्ट्राबरोबरच हरियाणातही विधानसभेची निवडणूक होणार आहे, पण भाजपने महाराष्ट्रातील निवडणुकीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्रात 10, तर पक्षाध्यक्ष शहा यांच्या 20 सभा होणार आहेत. सातार्‍यात लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. उदयनराजे भोसले हे भाजपकडून सातार्‍यात उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठीही मोदी-शहा यांच्या सभांचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. खासकरून पुणे, नागपूर, नवी मुंबई, पनवेल या मतदारसंघांत अधिक सभा घेऊन त्याचा थेट फायदा भाजपला पोहोचवण्यावर पक्षाचा भर असणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply