Breaking News

सिटीझन पर्सेप्शन सर्व्हेमध्ये सहभागी होण्याचे पनवेल मनपाचे आवाहन

पनवेल ः प्रतिनिधी

देशातील राहण्यायोग्य शहरांची स्पर्धा केंद्र शासनाने आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये एक लाख लोकसंख्या व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणार्‍या शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेत नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवायचे आहेत. पनवेल महापालिकाही या स्पर्धेत सहभागी झाली आहे. सिटीझन पर्सेप्शन सर्वेमध्ये महापालिका क्षेत्रातील नागरिकांना सहभागी होऊन अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

सिटीझन पर्सेप्शन सर्व्हेविषयी अधिक माहिती देण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात विविध संघटना, संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक शुक्रवारी  (17 नोव्हेंबर) बोलविण्यात आली होती. या वेळी  उपायुक्त विठ्ठल डाके, उपअभियंता सुधीर सांळुखे, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी, महापालिका अधिकारी व कर्मचारी तसेच इंडियन मेडिकल असोसिएशचे सदस्य डॉ. गिरीश गुणे, रोटरी क्लब खारघरचे कमलेश धानगलकर, जेष्ठ नागरिक संघाचे सचिव सुनिल खेडकर, कफ संस्थेच्या रंजाना सडोलीकर, इन्फिनीटी फाऊंडेशनचे आयुब आकुला, डॉक्टर्स असोसिएशनचे सचिव डॉ. गोपाल लांबटन, रोटरी क्लब पनवेलचे कल्पेश परमार, रोटरी क्लब पनवेल सेंट्रलचे अनिल ठाकेकर, आरसीपीआयटीचे सचिव हितेश राजपुत, अल्ट्रास्टिक फाऊंडेशनचे विजय चव्हाण उपस्थित होते.

पनवेल शहर हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. महापालिकेने आत्तापर्यंत वडाळे तलाव, जुई तलाव यांचे पूर्वीचे रूप पालटून त्याचे खास आकर्षण केंद्रात रूपांतर केले आहे. याचबरोबरीने छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभिकरण असे अनेक प्रकल्प राबविले आहे. याचबरेाबरीने खारघर मधील सिडकोच्या माध्यामातून विकसित करण्यात आलेले उत्सव चौक, शिल्प चौक, सेंट्रल गार्डन हे महापलिका क्षेत्रातील विशेष आर्कषणाची स्थळे आहेत. उत्तम रस्ते, उत्तम आरोग्य सुविधा, उत्तम उद्याने, उत्तम शिक्षण अशा विविध सेवा देण्यासाठी महापालिका मेहनत घेत आहेत.

येत्या काळात महापालिका नागरिकांना अत्याधुनिक रूग्णालये, खेळाची मैदाने , किक्रेट अकॅडमी असे महत्वपूर्ण प्रकल्प, व गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यासाठी झटते आहे. नागरिकांनी आपल्या शहराबद्दल अभिमान बाळगून या ‘ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी  व्हावे.  आपले शहर राहण्यायोग्य शहरामध्ये  समावेश करण्यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या शेश्र2022.ेीस या वेबसाईटवर जाऊन आपल्या शहराबद्दलचा अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. याचबरोबर महापलिका क्षेत्रात सर्वत्र या विषयीचे बॅनर्स लावण्यात आले आहे, यावर केंद्र शासनाने दिलेला क्यूआर कोड तसेच सिटी कोड देण्यात आला आहे. नागरिक हा क्यूआर कोड स्कॅन करूनदेखील आपला अभिप्राय नोंदवू शकतात.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply