Breaking News

पनवेल भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; शेकाप, शिवसेना पदाधिकार्यांच्या हाती ‘कमळ’

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता दिवसेंदिवस पक्षप्रवेशाचे प्रमाण वाढताना दिसत असून, वाजे येथील शेकाप आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 1) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

पनवेल येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रभाग क्रमांक 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, नगरसेविका दर्शना भोईर, राजेश भोईर, रूपेश भोईर, महिला मोर्चाच्या सपना पाटील आदी उपस्थित होते.

या वेळी पनवेल तालुक्यातील वाजे येथील शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मदन पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष राघो पाटील, शिवसेनेचे गणेश पाटील यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply