Breaking News

मुंढाणीत कौटुंबिक वाद

परस्परांविरोधात गुन्हा दाखल

नागोठणे : प्रतिनिधी

घरगुती भांडणाचा राग धरून दोन्ही चुलत भाऊ तसेच त्यांच्या पत्नींनी एकमेकांना मारहाण तसेच धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची घटना विभागातील मुंढाणी गावात घडली असून दोघांनी एकमेकांविरुद्ध केलेल्या तक्रारीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढाणीतील प्रकाश रामदास घासे आणि सुरज सीताराम घासे हे दोघे चुलत भाऊ आहेत. घरगुती भांडणाचा राग अनावर झाला आणि सुरज घासे यांनी प्रकाश घासे यांच्या डोक्यात हत्याराने फटका मारला, तर सुरज आणि हिराबाई घासे यांनी प्रकाश आणि नमिता घासे यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात प्रकाश घासे यांनी सुरज व हिराबाई घासे यांच्या विरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. असाच प्रकार प्रकाश घासे व नमिता घासे यांनी सुरज आणि हिराबाई घासे यांच्याबाबतीत केल्याने सुरज घासे, हिराबाई घासे यांनीसुद्धा प्रकाश घासे, नमिता घासे यांच्या विरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सहाय्यक फौजदार मोहन म्हात्रे पुढील तपास करीत आहेत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply