Breaking News

भाजप-शिवसेना युतीचे उमेदवारी अर्ज दाखल

चिपळे, कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीत झंजावात

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील चिपळे आणि कर्नाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांनी आपले अर्ज शनिवारी (दि. 9) तहसील कार्यालयात दाखल केले. या वेळी भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत उपस्थित होते. या दोन्ही ठिकाणी युतीला अनुकूल वातावरण दिसत आहे. 

चिपळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या सरपंचपदाच्या उमेदवार कविता संदीप शीद; तर सदस्यपदासाठी मंगेश फडके, धीरज फुलोरे, अमृता फुलोरे, अर्चना पाटील, कुंदा ठाकूर, रंजना पाटील, जयश्री म्हस्कर, गणेश म्हस्कर, मीनाक्षी फडके, ज्ञानेश्वर फडके, संदेश फडके, ललिता पाटील, वैशाली पाटील या युतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला.

या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंढरीनाथ फडके, सुमती पंढरीनाथ फडके, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, विश्वजीत पाटील, कविता गायकवाड, माजी सरपंच दीपाली फडके, रामदास पाटील, कृष्णकांत पाटील, तुकाराम पाटील, रमेशशेठ पाटील, गणेश म्हस्कर, अंकुश पाटील, संदीप शीद, गुरुनाथ फडके, सुनील पाटील, मिन्नाथ पाटील, दीपक पाटील, हरिशदास फुलोरे, बबन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्नाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी  भाजप-शिवसेना युतीचे गणेश पाटील; तर सदस्यपदासाठी सुरेश हापसे, तुळसा सुरेश हापसे, सुनीता वाघमारे, विकास पाटील, रोशनी पाटील, जिशान दाखवे, कमला पाटील, जगदीश जंगम, शुभांगी विश्वासराव, राम सवार, शर्मिला पाटील, रत्नमाला म्हात्रे या युतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

या वेळी चंद्रकांत पाटील, अश्फाक दाखवे, लक्ष्मण गावंड, उमेश पाटील, जनार्दन कोळी, जितेंद्र पाटील, रोशन पाटील, लक्ष्मण पाटील, प्रशांत पाटील, संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 24 मार्च रोजी मतदान आहे.

Check Also

‘गीतगंधाली’तून उलगडला कर्मवीर अण्णांचा जीवनपट

सातारा येथील कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती सातारा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मवीर …

Leave a Reply