Breaking News

भेरलेतील आदिवासी बांधवांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंजावात पाहायला मिळत आहे. त्या अंतर्गत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ग्रामीण भागात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी भेरले येथील आदिवासी बंधूंनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

पनवेलच्या सर्वसमावेशक विकासासाठी कार्यसम्राट आमदार आणि भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्षांचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना मतदान करण्याचा निर्णय भेरलेतील बहुसंख्य ग्रामस्थांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने भेरले गावातील बंधू कातकरी, कांता भोरे, नथुराम कातकरी, रवी कातकरी, भाऊ कातकरी, शांताराम कातकरी, सुनील नाईक, सचिन वाघमारे, एकनाथ कातकरी, जगदिश कातकरी, भुरा वाघमारे यांच्यासह अनेक अदिवासी बांधवांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी स्वागत केले. या वेळी भाजप तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply