Breaking News

सब का साथ, सब का विकास, या भावनेतूनच रविशेठ पाटील यांचे कार्य -पूजा पाटील

पेण : प्रतिनिधी

सब का साथ, सब का विकास, या भावनेतूनच आमचे नेते रविशेठ पाटील यांची कार्यप्रणाली असून, त्यांनी पेण तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन वढाव सरपंच पूजा पाटील यांनी केले. भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्यासाठी पेण तालुक्यातील वढाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत सरपंच पूजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्या बोलत होत्या. रविशेठ पाटील यांना वढाव भागातून मतांची मोठी आघाडी मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला. वढाव येथील मंदिरात प्रचाराचा नारळ वाढविल्यानंतर सरपंच पूजा पाटील यांनी घरोघरी जाऊन रविशेठ पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील निवडणुकीत वढाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवून या भागात विकासकामे मार्गी लावण्याचे काम करण्यात येत आहे. पेण मतदारसंघाच्या विकासासाठी रविशेठ पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही हे आता येथील जनतेने जाणले असून रविशेठ पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. या प्रचारफेरीत भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेश वर्तक, अशोक पाटील, उदय म्हात्रे, भाई म्हात्रे, तुकाराम वर्तक, ग्रामपंचायत सदस्य ज्योती म्हात्रे, शिवा नाईक, माजी सदस्य बाळकृष्ण म्हात्रे, उत्तम ठाकूर, राजेश म्हात्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply