Breaking News

माझा विजय निश्चित -रविशेठ पाटील

तरणखोप विभागातील मतदारांशी साधला संवाद

पेण : प्रतिनिधी

कार्यकर्त्यांचे परिश्रम, शिवसेना व मित्रपक्षांचे मजबूत पाठबळ, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, मतदारांचा पाठिंबा या बळावर आपण दणदणीत मताधिक्याने विजयी होणार, असा विश्वास पेण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी व्यक्त केला. भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी तरणखोप विभागातील गावागावांत जाऊन मतदारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. या विभागात आपल्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, कार्यकर्ते आपल्या विजयासाठी कामाला लागले आहेत. आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांच्या देहबोलीतून दिसून येत आहे, असे रविशेठ पाटील यांनी सांगितले. राज्यात व केंद्रात सहकार्य करणारे सरकार असल्याने या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी चालून आली आहे. म्हणूनच माझ्या सर्व मतदारांनी ‘कमळ’ निशाणीवर शिक्का मारून हा मतदारसंघ पुन्हा एकदा प्रगतिपथावर नेण्याची संधी द्यावी, अशी भावनिक साद रविशेठ पाटील यांनी मतदारांना घातली. पेण विधानसभा मतदारसंघातील तरणखोप विभागात महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचाराला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या विभागातून रविशेठ पाटील यांना आघाडी मिळवून देणारच, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पाटील यांनी या वेळी दिली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply