कळंबोली : रामप्रहर वृत्तभाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार तथा कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 13) कळंबोलीमध्ये भव्य बाइक रॅली झाली. या रॅलीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. त्याची झलक या रॅलीत पाहावयास मिळाली. या रॅलीत आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, भाजप कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper