नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जालंधर येथे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत होणार्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील महिला विभागात जागतिक कांस्यपदक विजेती विनेश फोगट (55 किलो) व ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक (62 किलो) प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. पुरुषांत फ्री स्टाईल, ग्रीको रोमन व महिलांच्या विविध गटांत होणार्या स्पर्धेत देशातील 500 कुस्तीपटू सहभागी होणार आहेत.
दिव्या काक्रन (68 किलो), सीमा बिस्ला (50 किलो), सरिता मोर (57 किलो) आणि नवज्योत कौर (65 किलो) या कुस्तीपटूही स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पुरुषांत साजन (77 किलो), गौरव बलियान (74 किलो), सुमित मलिक (125 किलो), सत्यवर्त कडियान (97 किलो) आणि राहुल मान (70 किलो) यांसारखे मातब्बर कुस्तीपटू स्पर्धेत त्यांचे कौशल्य दाखवणार आहेत.