Breaking News

आदिवासींना रोटरी क्लबकडून मदतीचा हात

कर्जत ः बातमीदार

निसर्ग चक्रीवादळामुळे कर्जत तालुक्यातील शिंगढोळ गावाचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी आणि गरीब लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड येथील रोटरी क्लबकडून त्यांना महिनाभराचे रेशन आणि संसार उपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली.

कर्जत रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रामदास घरत यांनी शिंगढोल गावाची स्थिती रोटरी इंटरनॅशनल आणि डिस्ट्रिक्ट यांना अवगत करून दिली व मदतीसाठी हाक दिली. ज्येष्ठ रोटरीयन नितीन ढमाले, रोटरी क्लब पिंपरी-चिंचवड यांनी शिंगढोळ ग्रामस्थांच्या हाकेला प्रतिसाद दिला. एका कंपनीच्या माध्यमातून शिंगढोळमधील आदिवासी समाज तसेच दलित समाज आणि गावातील गरजू कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. या वेळी रोटरी कर्जतचे रामदास घरत, हुशेन जमाली, जितू ओसवाल, सुनील सोनी, सोपान भालिवडे, वामन खंडागळे, अर्जुन घरत, भिकाजी मुकणे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा फाले उपस्थित होते. शेखर भालिवडे, प्रणित घरत, प्रवीण फाले, ह्षिकेश भालिवडे या तरुणांनी धान्य वाटप करताना रोटरी क्लबच्या पदाधिकार्‍यांना मदत केली.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply