Breaking News

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसन विजेता

कोलकाता : वृत्तसंस्था

टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत झालेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकाराच्या नऊ लढतींपैकी अखेरच्या पाच लढतींमध्ये फक्त एक गुण कमावणार्‍या भारताच्या विश्वनाथन आनंदला प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी पात्र होण्यात अपयश आले. मॅग्नस कार्लसनने मात्र वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर एकूण विक्रमी 27 गुणांसह जेतेपदावर नाव कोरले.

वर्षाच्या पूर्वार्धात अबिदजान (आयव्हरी कोस्ट) येथे झालेल्या स्पर्धेत कार्लसनने 26.5 गुण मिळवले होते. तो विक्रम कार्लसनने मोडीत काढला. अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने 23 गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर वेस्ली सो (अमेरिका) आणि अनिश गिरी (नेदरलँड्स) या दोघांनी प्रत्येकी 18.5 गुणांसह तिसरे स्थान पटकावले.

भारताच्या आनंदला 16 गुणांसह सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर पी. हरिकृष्णा आणि विदित गुजराथी यांना प्रत्येकी 14.5 गुणांसह आठवे स्थान मिळाले. लंडन येथे होणार्‍या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी कार्लसन, डिंग लिरेन, अरोनिय, मॅक्झिमे व्हॅचिएर-लॅग्रॅव्ह पात्र ठरले आहेत. या वेळी आनंदला पात्रतेसाठी अवघा दीड गुण कमी पडला.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply