Breaking News

वॉटर हिरो कॉन्टेस्ट स्पर्धेत ‘सीकेटी’च्या दिक्षाला विजेतेपद

पनवेल : रामप्रहर वृत्त

जलशक्ती मंत्रालय व जल संशोधन नदीविकास आणि गंगा संरक्षण विभाग, नवी दिल्ली आयोजित केलेल्या वॉटर हिरो कॉन्टेस्ट (थरींशी कशीे उेपींशीीं) स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी दिक्षा मनोज सोनार हिने सहभाग घेऊन विजेतेपद संपादन केले. पारितोषिक म्हणून या विद्यार्थिनीस 10 हजार रुपये व प्रमाणपत्र मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत संपूर्ण भारतातून सहभाग नोंदविण्यात आला होता. यातून फक्त 10 विजेतेपदे मिळाली आहेत. या 10 विजेत्या स्पर्धकांमध्ये दिक्षा सोनार ही एकमेव विद्यार्थिनी आहे. हे विशेष कौतुकास्पद आहे. तिच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत, पर्यवेक्षक प्रशांत मोरे, अजित सोनवणे, वर्गशिक्षक तसेच इतर सर्व शिक्षकांनी तिचे विशेष कौतुक केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply