श्रीगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील धेरंड येथील जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने व पोयनाड-शहाबाज क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने तीनवीरा येथील क्रीडांगणावर ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पिरबाबांचा गाव मेढेखार संघ अंतिम विजेता ठरला. द्वितीय क्रमांक झुंजार पोयनाड, तृतीय व चतुर्थ क्रमांक बी. सी. सी. तीनवीरा व बालयुवक पेझारी या विजयी संघांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले, तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज विनोद पाटील (तीनवीरा), उत्कृष्ट गोलंदाज प्रमोद पाटील (पेझारी), मालिकावीर नितेश पाटील (मेढेखार), प्रेक्षक हिरो मृणाल पालव (पोयनाड), सामनावीर हितेश पाटील (मेढेखार) यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय हनुमान क्रिकेट क्लब धेरंडच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …