पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत आहे. 15 दिवस चालणार्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते खारघर, सेक्टर 36मधील शिर्के बांधकाम क्षेत्रात करण्यात आले. 0 ते 5 वर्षांतील बालकांना सात वेळा लस दिली जाते. क्षयरोग कावीळ-ब, पोलिओ, गोवर-रूबेला, घटसर्प, डांग्या खोकला, टिटॅनस, हिमोफिलस इन्फलुझा टाईप बी अशा आजारांपासून संरक्षण करण्याकरिता बालकांचे लसीकरण करणे महत्त्वाचे असते. मिशन इंद्रधनुष्य 0.3 योजनेत 0 ते 2 वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थी बालके व गर्भवती महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. या मोहिमेंतर्गत शहरालगत असणार्या स्थलांतरित होणार्या झोपडपट्ट्या, बांधकामाची ठिकाणे, वीटभट्ट्या, भटक्या जमाती आणि इतर क्षेत्रांत हे लसीकरण केले जाणार आहे.