Wednesday , February 8 2023
Breaking News

नीलची जलतरण स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

पेण ः प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने 15 डिसेंबर रोजी चिवला बीच, मालवण येथे 10व्या खुल्या जलतरण स्पर्धा 2019 आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत दोन किलोमीटरमध्ये 11-12 वर्षे वयोगटात कुमार नील योगेश वैद्य याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर नाव कोरून चषक पटकाविला.

नील वैद्य पेण नगरपालिकेच्या मामा वास्कर जलतरण तलावात सराव करीत असून पेण शिक्षण महिला समितीच्या शाळेत इंग्रजी माध्यमात इयत्ता 7वीत शिकत आहे. त्याच्या यशात त्याचे मार्गदर्शक व आईबाबांचा मोठा वाटा आहे. या यशाबद्दल पेण हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष मंगेश नेने, उपाध्यक्ष ललित पाटील, सहसचिव पांडुरंग म्हात्रे, पेण शिक्षण महिला समितीच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या अध्यक्षा, मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने त्याचे अभिनंदन केले आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply