Breaking News

रोहा शहराचा विकास साधू या

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे प्रतिपादन

रोहे ः प्रतिनिधी

आपण सर्वांनी हातात हात घालून रोहे शहराचा विकास साधू या, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केले. रोहे येथील श्री. धावीर मंदिरात साडेसहा लाख रुपये खर्च करून सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याची सुरुवात व येथील भाटे वाचनालयास लाखाचा धनादेश देण्याचा कार्यक्रम नुकताच भाटे चनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात अनंत गीते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन प्रधान यांनी, तर सूत्रसंचालन निखील दाते यांनी केले. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या माध्यमातून श्री धावीर मंदिरासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभा राहात आहे, या प्रकल्पाच्या माध्यामातून मंदिरास पुढील 25 वर्षे वीज मिळणार असल्याची माहिती मकरंद बारटके यांनी या वेळी दिली, तर श्री धावीर मंदिर व भाटे वाचनालय या रोहेकरांच्या आस्मिता असल्याने त्या चांगल्या पद्धतीने टिकल्या आहेत, असे समीर शेडगे यांनी सांगितले. भाटे वाचनालयात झालेल्या कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे, भाटे वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत तलवार, अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, उस्मान रोहेकर, सायली कुलकर्णी, समीक्षा बामणे, नीता हजारे, दीपक तेंडुलकर, जयवंतराव पोकळे, मकरंद बारटके, अनिष शिंदे, सचिन फुलारे, नितीन वारंगे, संतोष खेरटकर, तर श्री धावीर मंदिर येथे शिवसेना जिल्हा प्रमुख रवी मुंढे, लालताप्रसाद कुशवाह, प्रकाश पवार, महेश सरदार, नितीन परब, संदीप सरफळे, यतीन धुमाळ, शैलेश रावकर, योगेश डाखवे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते. सचिन कुलकर्णी यांनी आभार मानलेे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply