Monday , February 6 2023

मेहबूब हायस्कूलमध्ये हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात

मुरूड ः प्रतिनिधी

मुलांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती राहावी, तसेच मुले चपळ व चलाख बनण्यासाठी मेहबूब हायस्कूलतर्फे नुकतेच बीच हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हायस्कूलच्या क्रीडा सप्ताहानिमित्त विहूर बीच येथे बीच हॉलीबॉल स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते.

मेहबूब स्कूल विहूरच्या मुख्याध्यापिका सीमा रणदिवे यांच्या हस्ते बीच हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी फराहन दामाद, महेश पाटील, गजानन घाग, ईर्शाद कडू, प्रकाश भोस्तेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेत मुला-मुलींच्या 24 संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धा अतिशय उत्साही वातावरणात पार पडली. सर्व विजयी स्पर्धकांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन करण्यात आले.

-प्रथम क्रमांक संघ

अहमद खानजादा,

रझी मिरकर, मुरूड

-द्वितीय क्रमांक संघ

झिशान कापसे,

मनसूर बकवाल, नांदगाव

-मुलींमध्ये प्रथम क्रमांक

श्रृष्टी थळे,

उमेमा हासवारे, नांदगाव

-द्वितीय क्रमांक

आमरा पंगारकर,

सॉलिहा हल्डे, विहूर

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply