Breaking News

महिलेची 42 लाखांना फसवणूक

पनवेल : लग्न जुळविण्याच्या साइटवर खारघरमधील एका 55 वर्षीय महिलेला अज्ञात टोळीने तब्बल 42 लाख नऊ हजार रुपयांना गंडा घातला आहे. पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. 55 वर्षीय तक्रारदार महिला खारघरमध्ये राहण्यास असून तिचा पती कामानिमित्त परदेशात आहे. तिला एकटेपणा जाणवत असल्याने तिने दुसरे लग्न करण्याचा विचार करून सप्टेंबरमध्ये भारत मॅट्रिमोनियल वेबसाइटवर स्वत:चे प्रोफाइल बनविले. 15 दिवसांतच तिला लग्नास इच्छुक व्यक्तींची रिक्वेस्ट येण्यास सुरुवात झाली. यातील शौकत अली (55) नामक व्यक्तीची तिने निवड केल्याने शौकत अलीनेदेखील त्याच्या मोबाइल फोनवरून तिच्याशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विविध कारणे सांगून त्याने तिच्याकडून 42 लाख नऊ हजार रुपये उकळले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply