Breaking News

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा घोळ; पेपर, वेळ, आसनव्यवस्थेत त्रुटी; विद्यार्थ्यांमध्ये संताप

मुंबई ः प्रतिनिधी
आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान होणारा गोंधळ संपायचे नाव घेईना. या परीक्षेत रविवारी (दि. 24) पुन्हा घोळ झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई, पुणे आणि नाशिक येथील केंद्रांवर अनेक विद्यार्थ्यांना पेपर मिळण्यास उशीर झाल्याचे समोर आले, तसेच मुलांच्या आसनव्यवस्थेतही घोळ झाला. पुण्यात एका केंद्रावर परीक्षेची वेळ होऊनही विद्यार्थ्यांना आसन क्रमांक न मिळाल्याच्या तक्रारी समोर आल्या. पेपर मिळण्यात विलंब आणि आसनव्यवस्थेतील घोळावरून पुण्यातील एका केंद्रावर गोंधळ झाला, तर नाशिकमधील काही केंद्रांवर पेपर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. गिरणारेच्या केएच महाविद्यालयातील केंद्रावरही गोंधळ पाहायला मिळाला. विद्यार्थी जास्त आणि पेपर कमी आल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलाय. 11 वाजून गेल्यानंतरही पेपर सुरू झाला नव्हता. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. आरोग्य भरतीच्या पेपरमधील आयोजनात पुन्हा मोठा गोंधळ दिसत आहे. या परीक्षेत दोन सत्रांत पेपर असल्याने उमेदवारांना सकाळी एका जिल्ह्यात केंद्र देण्यात आले, तर दुपारी दुसर्‍या जिल्ह्यात केंद्र देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षेबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला. काही विद्यार्थ्यांनी याबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. याआधी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य सेवा परीक्षेवेळीही मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला होता. काही उमेदवारांना चुकीचे हॉल तिकीट मिळाले होते. राज्यातील आठ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणारी ही लेखी परीक्षा गोंधळामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना स्वतः माध्यमांपुढे येत पुढे ढकलावी लागली होती. त्यांनी त्या वेळी सारवासारव केली खरी, मात्र अजूनही हा प्रश्न सुटल्याचे दिसून येत नाहीये. याबाबत आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तांत्रिक अडचणीमुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply