आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांना प्रारंभ
कळंबोली : रामप्रहर वृत्त
कळंबोली येथे सिडको आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून उद्यान निर्मिती, पाण्याची पाईपलाईन बसविणे तसेच शौचालय बांधणे ही कामे करण्यात येणार आहेत. या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि. 9) करण्यात आले होते. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
सिडकोच्या वतीने रोडपाली येथे नवीन उद्यान निर्मिती करणे, नवीन वसाहतीमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बसविणे तसेच पनवेल महापालिकेच्या वतीने शौचालये बांधण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगसेवक अमर पाटील, राजू शर्मा, नगरसेविका प्रमिला पाटील, विद्या गायकवाड, भाजपनेते बुधाजी ठाकूर, कळंबोली शहर अध्यक्ष रवीनाथ पाटील, राजेंद्र बनकर, युवामोर्चा अध्यक्ष अमर ठाकूर, डी. एन. मिश्रा यांच्यासह आदर्श महिला मंडळ, आदर्श सामाजिक संस्था आणि ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासकामांसंदर्भात अधिक माहिती दिली.