Breaking News

रूचिता लोंढे यांच्या विजयासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते सज्ज, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील पोटनिडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान आहे. निवडणुकीत भाजप, आरपीआय युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांना विजयी करण्यासाठी युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोरदार प्रचार करताहेत. या पार्श्वभूमीवर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात गुरुवारी (दि. 2) भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित बैठकीस भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, प्रकाश बिनेदार, राजू सोनी, मनोहर म्हात्रे, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, सीताताई पाटील, नंदू पटवर्धन, अविनाश कोळी, संदीप पाटील, सुनील घरत, अमरिश मोकल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply