Breaking News

पनवेल महापालिका क्षेत्रात 100 टक्के नागरिकांना पहिली मात्रा

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग

पनवेल : प्रतिनिधी

कोविड 19 लसीकरणाचे महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या निर्देशानुसार योग्य नियोजन केल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील 18 वर्षांवरील 100 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केला आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानूसार 16 जानेवारीला महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरणास सुरूवात झााली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांचे  लसीकरण करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यात पहिल्या फळीतील कर्मचार्‍यांचे यामध्ये पेालिस विभाग, महसूल विभाग आदी कर्मचार्‍यांचा समावेश होता. तिसर्‍या टप्प्यात जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यानंतर 45 ते 60 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शेवटच्या टप्प्यात 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

लसींचा साठा मोठ्या प्रमाणात येऊ लागताच पनवेल महापालिकेच्या वतीने सुरुवातीला असलेली 12 लसीकरण केंद्रे वाढवून 23 केली तसेच जास्तीत जास्त लसीकरण होण्याच्या दृष्टीने प्रत्येक लसीकरण केंद्रांची क्षमता तीन पट वाढविली यामुळे दर दिवशीचे सरासरी 13 ते 14 हजार लसीकरण दररोज करण्यात आले.

पालिका हद्दीतील ग्रामीण भागातील जनतेसाठी  प्रत्येक गाव-पाड्यांवर लसीकरण सत्र उभारण्यात आले. यामुळे 100 टक्के गावांचे लसीकरण होऊ शकले. शासकीय ओळखपत्र नसणार्‍यांचे विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. वारांगना, बेडरिडन, गर्भवती, दिव्यांग अशा विविध घटकांना सामावून त्यांचे विशेष लसीकरण आयोजित करण्यात आले. पालिका हद्दीतील विविध वृध्दाश्रम, तळोजा जेल याठिकाणीही लसीकरण करण्यात आले.

लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात होण्याकरीता 79 खाजगी रुग्णालय यांना अर्बन टास्क फोर्स अंतर्गत मान्यता देऊन जवळपास 150 खाजगी  लसीकरण केंद्रांना मान्यता दिल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील लसीकरण व मोठ्या सोसायट्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण झाले.

गेल्या काही दिवसांपासून मिशन कवच कुंडल अंतर्गत पालिका क्षेत्रातील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण पुर्ण होण्याकरीता आयइसी, बॅनर, माईकिंग, मान्यवरांचे व्हिडीओ याद्वारे पालिकेने जनजागृती केली. यासाठी जवळपास 70 टिम कार्यरत करुन सोसायटी निहाय व एरीया निहाय मोबाईल लसीकरण बुथ उभारण्यात आले. 

आत्तापर्यंतच्या या सर्व नियोजनामुळे पनवेल महापालिकेचे एकुण 8,14,000 लोकसंख्येपैकी 18 वर्षांवरील 5,98,127 लोकसंख्येपैकी  5, 46,747 इतक्या लोकांनी पहिला डोस घेतला आहे. म्हणजेच जवळपास 91.41लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तसेच 2,87,217 नागरिकांचा दुसरा डोस म्हणजे जवळपास 48 टक्के पुर्ण करण्यात आला आहे.

मिशन कवच कुंडल आणि पल्स् पोलिओ अभियानाअंतर्गत जनेतेस आवाहन व सर्व्हे केल्या. दरम्यान, असे आढळून आले की जे 53,331 शिल्लक नागरिक आहेत हे नागरिक मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथे कामानिमित्त जात असतात त्यांचे त्याठिकाणीच लसीकरण झाले आहे. तरी कोविड 19 च्या डोसचे 100 टक्के लसीकरण पालिकेने पूर्ण केले आहे.

सध्या शहरी भागात 25 लसीकरण केंद्र सुरू असून ग्रामीण भागात 30 ठिकाणी आठवड्यातील ठराविक दिवशी लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. ज्या नागरिकांचे दुसर्‍या डोसचे लसीकरण राहीले आहे त्यांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे.

-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply