Breaking News

ग्रामीण व्यवसायाला चालना देणारे ‘रायगड सरस’

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा परिषद, रायगडच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत पनवेल मधील गुजराती शाळा मैदान, पटवर्धन हॉस्पिटल समोर भव्य रायगड सरस 2020  प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमाचे 9 ते 13 जानेवारी 2020 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या उत्पादनाना योग्य बाजारपेठ उपलब्ध होत असून ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहचून स्वयंसहायता समूहातील महिलांच्या व्यवसायाला चालना रायगड सरस मुळे मिळत आहे. रायगड सरस 2020 मध्ये रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उरण पंचायत समितीचे सभापती अ‍ॅड. सागर कडू, उपसभापती शुभांगी पाटील, केसरीनाथ घरत, डी.बी. घरत यांनी भेट दिली असून सहभागी महिलांचे अभिनंदन केले. प्रकल्प संचालक प्रकाश देवरुषी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे, जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ आदी उपस्थित होते. सरसमधील व्यवस्थापन पाहून अ‍ॅड. सागर कडू यांनी समाधान व्यक्त केले तर ग्रामीण भागातील महिलाना रायगड सरस हे उत्तम बाजारपेठ उपलब्ध झाल्याचा आनंद त्या महिलांच्या चेहर्‍यावर दिसल्याचे शुभांगी पाटील यांनी संगितले. त्याचप्रमाणे समूहातील महिलांनी अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन केले असून स्तुत्य उपक्रम असल्याची प्रतिक्रिया केसरीनाथ घरत यांनी दिली. ग्रामीण भागातील अस्सल चवदार पदार्थांची लज्जत सोबतच मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  शनिवारी (दि. 11) मनोरंजनात्मक कार्यक्रम कलर्स मराठी रायझिंग स्टार सागर म्हात्रे यांच्या गायनाचा कार्यक्रम तर रविवारी (दि. 12) उरण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचे विविध कलागुण दर्शन कार्यक्रम, सोमवारी (दि. 13) शाहीर वैभव घरत यांच्या मराठमोळ्या पोवाडा व स्फूर्ति गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. जास्तीत जास्त लोकांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ यांनी केले असून सरस यशस्वी करण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष रायगड परिश्रम घेत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply