Breaking News

उरण येथील फुंडे हायस्कूलमध्ये ‘करियर डे’ साजरा

उरण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे, तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे गुरुवारी (दि.16) करियर कौन्सलिंग सेल अंतर्गत ‘करियर डे’ साजरा करण्यात आला.

खर तर दहावी-बारावी नंतर पुढे काय? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडलेला असतो. नेमकी अशाच वेळी विद्यार्थ्यांना योग्य त्या मार्गदर्शनाची गरज असते. विद्यार्थ्यांना योग्य त्या करीयरची निवड करता यावी या उद्देशाने विद्यालयात करियर कौन्सलिंग सेल अंतर्गत ‘करियर डे’चे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक आणि अटल टिंकरिंग प्रयोगशाळेचे प्रमुख एस. डी. म्हात्रे यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून भूमिका पार पाडली.

मार्गदर्शनपर बोलत असताना दहावी-बारावीच्या वयात विद्यार्थ्यांनी योग्य त्या क्षेत्राची निवड केली पाहिजे, त्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे एस. डी. म्हात्रे सरांनी अतिशय समर्पकपणे सांगितले. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांना

स्वतःच्या भविष्याचा वेध घेण्याची प्रेरणा दिली. त्याचप्रमाणे उद्योगक्षेत्रात अग्रेसर असणार्‍या अनेक नामवंत उद्योजकांची, खेळाडूंची, वैज्ञानिकांची उदाहरणे देत त्या क्षेत्राकडे करियर म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन त्यांनी विकसित केला. सुमारे दोन तास त्यांनी न व्यावसाय मार्गदर्शन केले. त्यांनतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन देखील केले.

याप्रसंगी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका आशा मांडवकर आणि सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. प्रशांत पाटील यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply