Breaking News

वीर वाजेकर कॉलेजमध्ये राष्ट्रीय युवा दिन

उरण : वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डीएलएलई व एनएसएस विभागामार्फत राष्ट्रीय युवा दिन समारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे येथील रयत प्रबोधिनीचे संस्थापक व प्रसिद्ध वक्ते सचिन पवार, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे उपस्थित होते. सचिन पवार व प्राचार्य डॉ. गोरख सांगळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीएलएलईचे प्रमुख प्रा. डॉ. एस. व्ही. घोडके यांनी, सूत्रसंचालन कल्याणी ठाकूर आणि डीएलएलईच्या विद्यार्थांनी तर आभार डॉ. एम. सी. सोनवले यांनी मानले. कार्यक्रमाला एनएसएस प्रमुख प्रा. डॉ. आमोद ठक्कर, डॉ. आर. एस. म्हात्रे, प्रा. यु. टी. घोरपडे, ओएस सौ. आहेर तसेच विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply