पाली : प्रतिनिधी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सुधागड-पाली अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी (ता. 4) पाली पंचायत समिती प्रांगणात करण्यात आले. या अभियानाची जनजागृती करण्यासाठी पोषण रॅली काढण्यात आली.
या वेळी उपस्थितांनी पोषण शपथ घेतली. रांगोळी व गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सकस आहार प्रात्यक्षिक दाखविण्यात आले, तसेच स्वच्छता, एक हजार दिवस बाळाचे आणि आहार आरोग्यविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती रमेश सुतार, उपसभापती उज्ज्वला देसाई, सदस्या साक्षी दिघे व सविता हंबीर, प्रकल्प अधिकारी रंजना म्हात्रे, पर्यवेक्षक सुनीता भुरे व संगीत लखीमळे आदी पदाधिकारी व तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या.