पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्र 15, खांदा कॉलनीतील सेक्टर 7मधील श्रीजी संघ सोसायटीतील नागरिकांना सोसायटीच्या आवारातील ट्रान्सफार्मरमुळे जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत होते. गेली 13 वर्षे एमएसईबीकडे सोसायटीतील पदाधिकारी ट्रान्सफार्मर शिप्टींगसाठी पाठपुरावा करत होते, परंतु एमएसईबी प्रशासन प्रतिसाद देत नव्हते, तसेच कामास दिरंगाई करीत होते. ही समस्या भाजप नगरसेवक संजय भोपी यांच्यामुळे मार्गी लागली आहे.
गेली 13 वर्षे सातत्याने भेडसावणार्या समस्या घेऊन श्रीजी संघ सोसायटीच्या पदाधिकार्यांनी सहा महिन्यांपूर्वी स्थानिक नगरसेवक संजय भोपी यांच्याकडे समस्या मांडली. त्या वेळी भोपी यांनी सोसायटीच्या पदाधिकार्यांना ट्रान्सफॉर्मर शिप्टींगची समस्या दूर करण्यासाठी शब्द देऊन सहा महिन्यांतच याबाबत एमएसईबी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्याला यश येऊन ट्रान्सफॉर्मर शिप्टींग करण्यात आला. नवीन ट्रान्सफॉर्मरचे पूजन, तसेच कार्यान्वयन नगरसेवक संजय भोपी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सोसायटीतील सर्व पदाधिकारी, तसेच रहिवाशांनी भोपी यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांचे आभार मानले. एमएसईबीचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचेही सोसायटीच्या वतीने आभार मानण्यात आले. या कार्यक्रमास एमएसईबीचे अधिकारी अभियंता निलेश बुकटे, श्री. सुर्यतळ, कॉन्ट्रॅक्टर श्री. आभाळे, श्रीजी संघ सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी, अन्य पदाधिकारी व रहिवाशी उपस्थित होते. सर्वांनी आनंद व्यक्त केला.

RamPrahar – The Panvel Daily Paper